हा त्रास काय आहे?
ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये गुडघ्याच्या सांध्यातील गादी (कूर्चा) हळूहळू झिजते आणि हाडांमधील अंतर कमी होते. आयुर्वेदात याला 'जानुसंधिगत वात' म्हटले आहे. आजाराचा टप्पा (Grade) पाहून उपचार ठरवले जातात.
सामान्य लक्षणे
- चालायला सुरुवात करताना वेदना
- सकाळी जखडणे, जे काही वेळाने कमी होते
- गुडघ्यांचा आकार बदलणे किंवा पाय वाकडे होणे
- चालण्याचे अंतर कमी होणे
सामान्य कारणे
- वाढते वय
- वजन
- आनुवंशिकता
- सांध्यावर दीर्घकाळ अतिरिक्त ताण
आमच्याकडील उपचार
तपासणीनंतर डॉक्टर यांपैकी आपल्या गरजेनुसार उपचार निवडतात.
- 3RDT रिजनरेशन थेरपीरिजनरेशन थेरपीच्या संकल्पनेवर आधारित आमची विशेष उपचार प्रणाली. सांध्यांची स्थिती, आजाराची तीव्रता आणि वैद्यकीय तपासण्यांच्या आधारे नियोजन.
- जानुबस्तीगुडघ्याभोवती पिठाचे कुंपण करून त्यात कोमट औषधी तेल ठराविक वेळ धरून ठेवण्याची पारंपरिक उपचारपद्धती.
- बस्ती चिकित्साअनुवासन (तेल) व निरूह (काढा) बस्ती; वाताच्या विकारांमध्ये प्रमुख उपचार.
- अग्निकर्मआयुर्वेदातील विशिष्ट तंत्रानुसार, प्रशिक्षित वैद्यकीय देखरेखीखाली निवडक वेदनाबिंदूंवर केली जाणारी उपचारपद्धती.
- औषधोपचारमेरुपोषक व मज्जास्नायू पोषक आयुर्वेदिक औषधे; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच.
- पथ्य, व्यायाम व योगआहार, दिनचर्या, व्यायाम आणि योगासनांविषयी वैयक्तिक मार्गदर्शन.
उपयुक्त तपासण्या: उभे राहून दोन्ही गुडघ्यांचा X-ray; गरजेनुसार MRI
ही लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा
- विश्रांती घेतानाही आणि रात्री तीव्र वेदना
- गुडघ्यात अचानक मोठी सूज
रोजची काळजी
- सायकलिंग, पोहणे यांसारखा कमी ताणाचा व्यायाम
- जमिनीवर बसण्याऐवजी खुर्ची वापरा
- वेदनाशामक गोळ्या स्वतःहून दीर्घकाळ घेऊ नका
ही माहिती जनजागृतीसाठी आहे; ती डॉक्टरांच्या प्रत्यक्ष तपासणीला पर्याय नाही.